आमदार संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरुद्ध विनयभंग करणारे वक्तव्य केल्या प्रकरणाच्या आरोपाबाबत शिरसाट यांना पोलिसांकडून क्लीन चीट देण्यात आला आहे. डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या चौकशीनंतर शिरसाट यांना हा क्लीन चीट मिळाला आहे.
आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधील मेळाव्यात ठाकरे गटाच्या नेत्या सुषणा अंधारे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांच्याविरोधात महिला आयोगासह परळी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये हे वक्तव्य करण्यात आल्याने बीड पोलिसांनी ही तक्रार छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांकडे वर्ग केली होती. त्यानंतर डीसीपी दर्जाच्या एका अधिकाऱ्याकडून या तक्रार अर्जाची चौकशी करण्यात आली. मात्र संजय शिरसाट यांनी जेव्हा वक्तव्य केलं त्यावेळी अंधारे या त्या ठिकाणी नव्हत्या. घटनास्थळी व्यक्ती नसल्याने विनयभंग होत नसल्याचा निकष पोलिसांकडून काढण्यात आला आहे. त्या प्रकरणी अंधारे यांना पत्र पाठवून पोलिसांकडून कळवण्यात देखील आले आहे.
0 Comments