इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात करिअरच्या संधी : शाम बासरानी


 कोल्हापूर / आकाश माडगूळकर |

शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्यासन  व विस्तार विभागातील   इव्हेंट मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या सांगता समारंभा प्रसंगी कोल्हापूरच्या इव्हेंट मॅनेजमेंट अँड प्लॅनर असोसिएशनचे अध्यक्ष शाम बासरानी हे होते. अध्यक्षस्थानी विभागाची संचालक डॉ. रामचंद्र पवार होते. पाहुण्यांचे स्वागत डॉ. रामचंद्र पवार संचालक यांनी केले. प्रस्ताविक योगिता खबाले व पाहुण्यांची ओळख पुनम जाधव यांनी करून दिली.

बासरानी यांनी इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसायातील सद्यस्थिती व करिअर संधी या विषयावर मार्गदर्शन केले. बासरानी म्हणाले, आजचं युग हे इव्हेंटचं आहे. लग्न असो वा बारसं, बिल्डिंगची पूजा असो वा एखादा पुरस्कार सोहळा. त्याचा झक्कास इव्हेंट व्हावा लागतो. म्हणूनच हे इव्हेंट मॅनेज करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांसाठी सध्या बऱ्याच नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आजच्या युगात अनेक नवनवीन क्षेत्र करिअरसाठी खुली झाली आहेत. त्यातीलच एक आकर्षक असे क्षेत्र म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट! या क्षेत्रात काम करताना दिवसरात्रीचं बंधन ठेवून चालत नाही. डेडलाइन गाठताना कधी कधी तर २४ x ७ काम करावे लागते. आजच्या तरुण पिढीला भुलवणारं असं हे क्षेत्र आहे. ग्लॅमरस, एक्सायटिंग असं या क्षेत्राचं वर्णन करता येईल.इव्हेंट मॅनेजर म्हणून काम करताना तुमच्याकडे कल्पकता, नियोजन कौशल्य, चिकाटी, संयम, सहनशीलता हे गुण असायला हवेत.इव्हेंट मॅनेजमेंट हे एखादे परिषद, सांस्कृतिक कार्यक्रम, चॅरिटी शो प्रदर्शन, कार्यक्रम ब्रँड लाँच सुद्धा असू शकते. कार्यक्रमाच्या थीमनुसार जागेची (व्हेन्यू) निवड, डेकोरेशन, फर्निंशिंग, डिझाइन, कॅप्शन, फीडबॅक, स्क्रिप्टिंग, निमंत्रण पत्रिका, खानपान सेवा, मनोरंजनाचे कार्यक्रम, गेम्स आदी सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सगळ्यांच्या दृष्टीने आवश्यक गोष्टींची दखल घ्यावी लागते. छोट्या छोट्या गोष्टींकडेही दुर्लक्ष करून चालत नाही. आपले काम १०० टक्के चोख असायला हवे. असे मत शाम बासरानी यांनी मांडले.

कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी सगळ्यांचे आभार प्रमोद गिरी यांनी मानले. सूत्रसंचालन क्षितिजा पाटील यांनी केले. यावेळी डॉ. सुमन बुवा, आर एम जाधव, रवींद्र खैरे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments