बार्शी | 40 हजार रुपयांची लाच घेताना पोलीस पोलीस हेड कॉन्स्टेबलला पकडले रंगेहाथ


बार्शी | 

अटक करून तात्काळ जामीनावर सोडणे करिता 40 हजार रुपयांची लाच घेताना पोलीस हेड कॉन्स्टेबलला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.हर्षवर्धन हरिश्चंद्र वाघमोडे वय-41 वर्ष (नेमणूक – बार्शी तालुका पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण, रा. भवानी पेठ बार्शी सोलापूर) असे लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आलेल्या पोलिस हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे.

तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांच्यावर बार्शी तालुका पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर नंबर 160/2023, भादवि कलम 143, 147, 148, 149, 324, 327, 504, 506 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 अन्वये गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्ह्यामध्ये तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांना अटक करून तात्काळ जामीनावर सोडणे करिता व सदर गुन्ह्यामध्ये पुढील मदत करणे करिता 50,000/- रुपये लाचेची मागणी करून, तडजोडी नंतर 40,000/- रुपये लाच रक्कम स्वीकारताना सापळा कारवाई मध्ये पोलिस हेड कॉन्स्टेबल यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments