बार्शी | चंदनाची अवैधरित्या वाहतूक करणारा टेम्पो पोलिसाच्या ताब्यात; टेम्पोसह १३ लाखाचा मुद्देमाल जप्त


बार्शी |

महाराष्ट्रात चंदनाची लाकडे तोडणे हा कायद्याने गुन्हा आहे, चोरट्या पद्धतीने चंदनाच्या लाकडाचे तुकडे व ओले सुगंधी बारीक लाकूड स्वतःच्या फायद्या करिता एका टेम्पो मधून घेऊन जाताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले, असून १,९७,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेची फिर्याद पोलीस शिपाई अंकुश एकनाथ जाधव यांनी शहर पोलिसात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर कारवाई बार्शी शहर पोलिसांनी पोस्ट चौक येथे रात्री अकराच्या सुमारास केली आहे. पोलिसांनी ८७ हजार रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या तीन पोत्यांमध्ये ४३.५० वजनाचे ओले सुगंधी लहान-मोठे तुकडे, १,१०,२०० रुपये किमतीचे चंदनाचा बारीक असलेला तुकडा, ११ लाख किमतीचा टेम्पो आरटीओ पासिंग नंबर एम एफ ४५ ए एफ १३४१ असा मुद्देमाल शहर पोलिसांनी जप्त केला आहे. टेम्पोसह चंदनाचा १४ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून परवेश बशीर सय्यद (वय ४४) रा. भद्रावती कर्नाटक व नितीन गोरख राऊत (वय ४३) रा. सर्जापूर ता. बार्शी या दोघांवर बार्शी शहर पोलिसात भादवी कलम ३७९,३४ या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल हे करत आहेत. ही कारवाई बार्शी शहर स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments