धाराशिव | चॉकलेटचे आम्हीच दाखवून ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचारधाराशिव |

धाराशिव जिल्ह्यातील एका गावामध्ये चॉकलेटचे आमिष दाखवून ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना ही ४ एप्रिल रोजी संध्याकाळी चारच्या सुमारास घडली आहे. पीडित चिमुकलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी सविस्तर वृत्त असे की, आठ वर्षीय चिमुकलीवर घराशेजारीच राहणाऱ्या तरुणाने चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेमुळे धाराशिव जिल्हा हादरला आहे. पीडित चिमुकलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एका युवकावर भादवि कलम ३७६, ३७६ (अ) (ब) , ७७६ (२) (n) कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास ढोकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक करत आहेत.

Post a Comment

0 Comments