पोस्को गुन्ह्यात मदत करण्यासाठी मागितली लाच हिला पोलीस उपनिरीक्षकासह अन्य एक पोलीस एलसीबीच्या ताब्यात


नाशिक |

विनयभंग व पोस्को या गुन्ह्यात लवकर न्यायालयीन कोठडी मंजूर लवकर जाणून देण्यासाठी ८ हजाराची लाच मागितल्या प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक व पोलीस हवालदार यांना लाचलुच प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

MIDC पोलीस ठाणे अहमदनगर येथे विनयभंग व पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी मंजूर झाली असून त्यात त्याला जामीन लवकर मिळण्या करिता मदत करू व न्यायालयाने म्हणणे मागितल्या वर लवकर देऊ आठ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी  महिला पोलिस उप निरीक्षक, वय- 26वर्ष, नेमणूक एमआयडीसी पोलीस स्टेशन, अहमदनगर. रा. मूळ.मु. पो. आढळगाव , ता. श्रीगोंदा, जि.अहमदनगर. सध्या रा. दुध डेरी चौक, दत्त मंदिरा जवळ, वडगाव गुप्ता शिवार, अहमदनगर व संदीप रावसाहेब खेंगट, वय- 46 वर्ष, नेमणूक एमआयडीसी पोलीस स्टेशन, अहमदनगर. रा. मु. पो. बाभुर्डी बेंद, नगर दौंड रोड, ता. जि.अहमदनगर. या दोघांना ताब्यात घेण्यात आली आहे.

सदर कारवाई यांच्या मार्गदर्शनानुसार श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि व नाशिक परीक्षेत्र,नाशिक नारायण न्याहाळदे अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि यांच्या यांच्या नेतृत्वाखाली श्रीमती गायत्री म. जाधव , पोलीस निरीक्षक, पो. हवा. चंद्रशेखर मोरे. पो. ना. प्रकाश महाजन . चा.पो.हवा. संतोष गांगुर्डे पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments