सोलापूर | आई-वडिलांनी मोबाईल घेतला काढून; मुलाने मारली दहा फूट जिन्यावरून उडी


सोलापूर |

आई-वडिलांनी मोबाइल हातातून घेतल्याने चिडून चक्क
दहा फूट उंचीच्या बेसमेंटवरून उडी मारली. सोमवारच्या मध्यरात्री हा प्रकार घडला.पृथ्वी संतोषकुमार शिंदे (वय २०) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

उत्तर सदर बझार परिसरातील भारत हौसिंग सोसायटीत संतोषकुमार शिंदे कुटुंब वास्तव्यास आहे. नेहमीप्रमाणे कुटुंबातील सर्वांनी जेवण आटोपले. मुलं मोबाइवर फार वेळ पाहत बसत असल्याने संतोषकुमार शिंदे यांनी रविवारी रात्री बारा वाजल्यानंतरही मुलगा पृथ्वी हा मोबाइलवर पाहत असल्याने त्याकडून मोबाइल काढून घेतला. या प्रकारामुळे चिडलेल्या पृथ्वी याने कोणताही विचार न करता तो थेट जिन्यावरील बेसमेंटवर गेला आणि दहा फूट उंचीवरून त्याने उडी घेतली. यामुळे त्याच्या दोन्ही पायांना मुका मार लागला. दोन्ही हातांनाही खरचटले. तो विव्हळू लागला. 

काय झाले ते पाहण्यासाठी आई-वडील बाहेर आले तर मुलगा खाली पडल्याचे दिसले. रात्रीच्या वेळी आरडा ओरडण्याने आजूबाजूची मंडळी जागी झाली. तातडीने वडिलांनी त्याला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Post a Comment

0 Comments