धाराशिव | मोबाईलमध्ये आलेल्या लिंकला टच करणे पडले महागात ; महिला डॉक्टरला बसला ४० हजाराचा भुर्दड


धाराशिव |

 मोबाईलमध्ये आलेल्या लिंकला टच करणे एका महिला डॉक्टरला महागात पडले आहे. जवळपास ४० हजार रुपयाचा भुर्दड पडला आहे. या फसवणूक प्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे.

शहरातील डॉ. अमृता जगदिश राजेनिंबाळकर यांना दि. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी १७.३० ते १८.०० वा. सु. मैत्रीण दिव्या इंगळे यांच्या हॅक केलेल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन बिटकॉईन इन्वेस्टमेंट प्लॅनचा मेसेज आला.

यावर अमृता यांनी आपल्या मोबाईलमध्ये लिंकला टच केल्यानंतर फोन पे अकाउंट ओपन होवून त्यावर ४०,००० ₹ रक्कम टाकलेली असताना त्यात अमृता यांनी फोन पे युपीआय पीन टाकल्यानंतर एस बी आय बँक खात्यातून एकुण ४०,००० ₹ रक्कम कपात करुन यास्मीन बेगम, रायचुर कर्नाटक यांनी अमृता यांची ऑनलाईन फसवणूक केली.

अशा मजकुराच्या अमृता राजेनिंबाळकर यांनी दि. ४ एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- ४२० सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- ६६ (सी), ६६ (डी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments