बार्शी | अवैध गुटखा व मालवाहतूक ट्रक असा एकूण १,०१,७०,०००/- रु किंमतीचा चा मुद्देमाल जप्त



बार्शी  |

बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीत बार्शी लातूर रोडला एमआयटी कॉलेजच्या जवळ मालवाहतूक ट्रक मधून ६३  लाख ७० हजाराचा गुटखा व मालवाहतूक ट्रक ताब्यात घेतला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल रोजी रात्री गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, बार्शी शहर पोलीसबठाणे हददीमध्ये बार्शी लातूर रोडला, एम आय टी कॉलेजच्या जवळ, रस्त्याचे कडेला, अंधारात एक गुटख्याची पोती भरलेला ट्रक उभा आहे. अशी बातमी मिळाल्याने लागलीस सदर बातमीच्या अनुषंगाने एक पथक तयार करुन सदर ठिकाणी रवाना केले. सदर ठिकाणी जाउन पाहणी केली असता एम आय टी कॉलेजच्या जवळ, रस्त्याचे कडेला, अंधारात के ए ५६ ०१४४ असा आर टी ओ पासिंग असलेला एक ट्रक उभा होता. सदर ट्रकच्या जवळ जाऊन पाहीले असता त्यामध्ये दोन इसम बसलेले होते. 

त्यांना पोलीस असल्याचे सांगून सदर ट्रकमध्ये काय माल भरलेला आहे, याची विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देउ लागले, त्यामुळे सदर ट्रक मध्ये काय माल आहे हे पाहीले असता त्यामध्ये पांढ-या रंगाच्या गोण्या दिसून आल्या, सदर गोणी उघडून पाहीली असता त्यामध्ये हिरा कंपनीच्या गुटख्याची पाकीटे दिसून आली, त्यामुळे सदर दोन इसमांना ट्रकसह ताब्यात घेउन बार्शी शहर पोलीस ठाणे येथे येउन सदर मुददेमालाची खात्री केली असता  त्यामध्ये सुमारे ७६, ७०,०००/- रु किंमतीचा चा हिरा कंपनीचा गुटखा त्यामध्ये हिरा पान मसाला याच्या एकूण ३९० गोण्या व रॉयल ७१७ तंबाखू च्या २०० गोण्या अशा एकूण ५९० गोण्या, तसेच २५,००,०००/- रु किंमतीचा चा एक अशोक लेलंड कंपनीचा ट्रक असा एकूण १,०१, ७०, ०००/- रु किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असून, सदरबाबत अन्न व औषध प्रशासनाला अवगत करण्यात आले. असून पुढील योग्यती कायदेशिर कारवाई करत आहोत.

सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सपोनि सुधीर तोरडमल, सपोनि उदार, पोसई कर्णेवाड, पोसई शिरसट, तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहेकॉ शैलेश चौगुले, पोना अमोल माने, पोना  मनिष पवार, पोना वैभव ठेंगल, ज्ञानेश्वर घोंगडे, पोकॉ अर्जुन गोसावी, पोकॉ रविकांत लगदिवे, पोकॉ अविनाश पवार, पोकॉ अंकुश जाधव यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments