प्रा.डॉ. शकील शेख यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त


कोल्हापूर |

 राजर्षी  छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर मधील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक आणि वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. शकील शेख यांना महाराष्ट्र फाउंडेशन चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. चार एप्रिल रोजी सोलापूर येथे लोकमान्य टिळक सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे गेले आठ वर्ष समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो.प्रा.डॉ. शकील शेख गेली 14 वर्षे रयत शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहेत. डॉ.शेख हे सध्या राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्य सरोज(माई)पाटील, रयत मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य डॉ. एम. बी. शेख, कोल्हापूर इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील,प्राचार्य डॉ. एल. डी. कदम,न्यू कॉलेजचें प्राचार्य डॉ.व्ही.एम पाटील, उपप्राचार्य  डॉ.सिंधू आवळे, डॉ. व्ही. व्ही. किल्लेदार, तसेच महाविद्यालयातील इतर सहकारी प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments