धाराशिव | अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणावर कोणत्याही सपासपा वार ; धाराशिव हादरले


धाराशिव |

 धाराशिव तालुक्यातील टाकळी (बेंबळी ) येथे एका तरुणाचा खून केल्याच्या आरोपावरून गणेश युवराज सोनटक्के याच्याविरुद्ध बेंबळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खून कश्यामुळे झाला याची चर्चा दबक्या आवाजात सुरु असताना, एक धक्कादायक कारण समोर आले आहे.

टाकळी(बेंबळी ), ता. धाराशिव येथील-गणेश युवराज सोनटक्के याने दि.15.04.2023 रोजी 15.00 ते 18.00 वा. सु. काकासाहेब पाटील यांच्या ऊसाचे शेताजवळ गावातीलच तरुण सुधाकार शहाजी चौरे ( वय 23 वर्षे ) याच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार करून मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले. अशा मजकुराच्या मयताचे वडील- शहाजी वसंत चौरे यांनी दि. 16.04.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302,506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


मयत सुधाकार शहाजी चौरे ( वय 23 ) हा अविवाहित होता, आरोपी गणेश युवराज सोनटक्के हा त्याच्यावर संशय घेत होता. अनैतिक संबंधाच्या संशयावरून सोनटक्के याने सुधाकर चौरे याचा काटा काढल्याची माहिती समोर आली आहे. मयत सुधाकार शहाजी चौरे याच्या बहिणीचे लग्न एक महिन्यावर आले आहे. त्याअगोदर ही धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मयत सुधाकर चौरे याचे वडील शहाजी वसंत चौरे यांनी बेंबळी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे करीत आहेत

Post a Comment

0 Comments