अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून अनुदानाची रक्कम जमा होणार

मुंबई | 

मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. यामुळे शेतकरी अडचणीत आला होता. येथील आठही जिल्ह्यात एकूण 12 लाख 68 हजार 8 शेतकऱ्यांचे तब्बल 8 लाख 57 हजार 32.12 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. त्यामुळे यासाठी प्रशासनाने 1214 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.

दरम्यान, तब्बल चार महिन्यानंतर ऑनलाइन नोंदणी झालेल्या अर्जांचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून अनुदानाची रक्कम जमा होणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिले आहे.

परभणी आणि धाराशिव जिल्ह्याने स्वतःचे सॉफ्टवेअर तयार करून मदतीचे वाटप केले. परंतु, इतर जिल्ह्यांनी शासनाच्या सॉफ्टवेअरची प्रतीक्षा केली. त्यामुळे शासनाच्या नव्या सॉफ्टवेअरमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती ऑनलाइन पद्धतीने गोळा करण्यासाठी तब्बल तीन महिन्यांचा कालावधी लागला.

ज्यात आत्तापर्यंत 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता या 80 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित 20 टक्के शेतकऱ्यांच्या याद्या पुन्हा तपासून त्यानंतर त्यांना देखील मदतीचे वितरण केले जाणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 मध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत होते. यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Post a Comment

0 Comments