विवेकानंद कॉलेजमध्ये लोकशाहीवर राष्ट्रीय चर्चासत्र ; डॉ. प्रकाश पवार बीजभाषक



कोल्हापूर |

विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर (स्वायत्त) मध्ये राज्यशास्त्र  विभागातर्फे  'लोकशाही : काल, आज आणि उद्या' या विषयावर शनिवार, दि. २५ मार्च, २०२३ रोजी आयसीएसएसआर पुरस्कृत राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात राजकीय विश्लेषक प्रा.डॉ. प्रकाश पवार 'भारतीय लोकशाही आणि आयडिया ऑफ इंडिया' या विषयावर बीजभाषण करणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक डॉ. वसंत भोसले 'प्रसार माध्यमे आणि लोकशाही' यावर मार्गदर्शन करतील. तर, यशदा, पुणेचे मानद व्याख्याते श्री. भारत पाटील (आप्पा) 'स्थानिक स्वराज्य संस्था आणि भारतीय लोकशाही' यावर प्रकाश टाकतील. 

कोल्हापूर जिल्ह्यातील सामजिक संशोधन क्षेत्रातील  विद्यार्थी, प्राध्यापक व अभ्यासकांनी या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी व संशोधन निबंध सादर करण्यासाठी समीक्षा फराकटे (९४०४३९५१९३), दत्ता जाधव (९६८९४३०४९३), अजय पाटील (९८८११९९३९३) यांच्याशी संपर्क साधावा. इच्छुक श्रोत्यांनी व्याख्यानांचा आस्वाद घ्यावा. असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर.कुंभार यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments