धाराशिव | कारने धडक दिल्याने एक वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू


धाराशिव |

कानेगाव, ता. लोहारा येथील- तुकाराम हरी पुरी यांची मुलगी- पुजा तुकाराम पुरी, वय 1 वर्षे 4 महिने ही दि.11.02.2023 रोजी 12.00 ते 12.30 वा. सु. तुकाराम यांच्या घरासमोर रोडने पायी रस्ता ओलाडून जात जात होती. दरम्यान भरत पंडीत कदम रा. कानेगाव, ता. लोहारा यांनी त्याच्या ताब्यातील कार ही निष्काळजीपने चालवल्याने पुजा हिस समोरुन धडक दिली.

 यात पुजा ही गंभीर जखमी होउन मयत झाली. या अपघातानंतर नमूद वाहन चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या तुकाराम पुरी यांनी दि. 11.03.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ), सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments