बार्शी | मालवंडी येथे विजेचा शॉक लागून महावितरणच्या २६ वर्षीय कर्मचाऱ्यांचा मृत्यूबार्शी |

मालवंडी ग्रामपंचायत हद्दीत बिघाड दुरुस्त करताना विजेचा धक्कालागून मालवंडी येथील २६ वर्षीय महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (ता. २३) दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

निलेश राजेंद्र होनराव वय- २६, रा. मालवंडी, ता. बार्शी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निलेश होनराव हे मागील एक वर्षांपासून महावितरणच्या सुर्डी विभागात कार्यरत होते. मालवंडी व परिसरात त्याने महावितरणची कामे करून स्वतः ची वेगळी अशी ओळख निर्माण केली होती.

निलेश हा अविवाहित होता. त्याचा नुकताच एक महिन्यापूर्वी साखरपुडा संपन्न झाला होता. काळाने झडप घातल्याने कुटुंबासह मालवंडी गाव सुन्न झाले आहे. दरम्यान, निलेश चा हा अपघात होऊन दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाला असला तरी सदर ठिकाणी सहा वाजले तरी ना बार्शी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच महावितरणचे कर्मचारी हजार झाले नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे विद्युत रोहित्रावर निलेशचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून येत होता. मालवंडीसह परिसरातील नागरिकांनी मृतदेह पाहण्यासाठी गर्दी केली होती.

Post a Comment

0 Comments