धाराशिव |
तक्रारदार यांच्या मालकीच्या शेतजमिनीची संमतीपत्राप्रमाणे पत्नी व मुलाच्या नावे फेर फारला (खातेफोड) नोंद घेण्यासाठी दहा हजार रुपयाची लाच घेताना केमवाडी सज्जाचे तलाठी रविंद्र दत्तात्रय अंदाने यास एसीबी पथकाने रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे.
रविंद्र दत्तात्रय अंदाने ( वय ५५वर्षे ) तलाठी, सज्जा :- सावरगाव अतिरिक्त कार्यभार – केमवाडी सज्जा ता. तुळजापूर यांनी तक्रारदार यांच्या मालकीच्या शेतजमिनीची संमतीपत्रा प्रमाणे पत्नी व मुलाच्या नावे फेर फारला (खातेफोड) नोंद घेण्यासाठी प्रथम १५,०००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १०,०००/- रुपये लाच स्वीकारण्यास संमती १०,०००/- रुपये लाचरक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. त्यामुळे एसीबी पथकाने अटक करून तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपाधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, शेख, विष्णू बेळे, झाकीर काझी यांनी हा सापळा रचला होता.
0 Comments