शिराळे येते भावावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न ; पांगरी पोलिसात गुन्हा दाखलपांगरी |

बार्शी तालुक्यातील शिराळे गावामध्ये घरात राहायचे नाही म्हणत भावावर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. राजेंद्र लक्ष्मण चौधरी रा. शिराळे ता. बार्शी यांच्यावर पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद रवींद्र लक्ष्मण चौधरी यांनी पोलिसात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ३० मार्च रोजी पत्नी सारिका आई मंगल व बहीण अनिता घरामध्ये असताना तुम्ही या घरामध्ये कोणीही राहायचे नाही राजेंद्र चौधरी हे असे म्हणत शिवीगाळ करू लागले. हातातील चाकूच्या साह्याने मारण्याचा प्रयत्न करू लागल्यानंतर फिर्यादीने चाकू धरला, त्यामध्ये ते जखमी झाले आहेत. तुम्ही येथे राहायचे नाही राहिल्यास तुम्हाला जीव मारेल अशी धमकीही दिली. राजेंद्र चौधरी यांच्यावर पांगरी पोलिसात भादवी कलम ३२४,५०४,५०६ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments