बार्शी- कुर्डूवाडी रोडवर वैशाली हॉटेलजवळ अपघातात दुचाकी चालक जागी ठार ; तालुका पोलिसात नोंदबार्शी |

बार्शी कुर्डूवाडी रोडवर हॉटेल वैशाली जवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना २४ मार्च रोजी ४.१५ वा.च्या दरम्यान घडली आहे. या घटनेची फिर्याद संदीप बाबासाहेब गुंड रा.होळकर बागे शेजारी शिवाजीनगर, बार्शी यांनी तालुका पोलिसात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्डूवाडी रोडवरील हॉटेल वैशाली जवळ क्रमांक एम एच ०४ ई एल ३९९१ चालक उत्तम गोविंद मसलकर रा. शिरापूर ता. मोहोळ आपल्या ताब्यातील ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूला घेतल्यामुळे समोरून येणारा मोटरसायकल क्रमांक एम एच २० एपी ८४५६ चा चालक चंद्रकांत ज्ञानोबा गिराम रा. गोपेगाव ता. पाथरी जि. परभणी गंभीरित्या जखमी होऊन जागीच मयत झाले आहेत. मयत चालक गिराम यांचा मृतदेह शिविच्छेदनासाठी बार्शी ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला होता. ट्रक चालकाविरुद्ध तालुका पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहिता कलम २७९, ३०४ अ,४२७ व मोटार अधिनियम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments