सोलापूर | गाडी वॉशिंग करताना विजेचा धक्का लागून शोरूम मध्ये २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यूसोलापूर |

शोरूम मधील गाड्या वॉशिंग करताना विजेचा जोरदार धक्का लागून एका बावीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी जुळे सोलापूरात घडली. सोहेल सय्यद अली सय्यद (वय २२)रा. रेल्वे क्लब हाऊस विजापूर रोड असे मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे.

मयत सोहेल हा जुळे सोलापूर भागातील एका दुचाकी वाहनाच्या शोरूम मध्ये गाड्या वॉशिंग करण्याचे काम करत होता. वॉशिंग करताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो जागीच कोसळला. तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.

दरम्यान त्याचा मित्र ओंकार सोनल्लू याने अधिक माहिती दिली की, सोहेल हा जुळे सोलापूरातील यामाहाचे शोरूम असलेल्या आदित्य ऑटोमोबाईल्स मध्ये काम करत होता, त्या ठिकाणीच त्याला विजेचा धक्का बसून मृत्यू झाला परंतु अद्यापही त्याचा मालक साधे पाहायला सुद्धा आलेला नाही. पोलीस प्रशासनाने सोहेलला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments