परंडा तालुक्यातील सरपंच पती धाराशिवमध्ये एक लाखाची लाच घेताना अटकधाराशिव | 

जल जीवन मिशन अंतर्गत सौर उर्जेंवर आधारित दुहेरी पंप लघुनळ योजनेचे काम पुढे सुरु ठेवण्यासाठी एक लाखाची घेताना परंडा तालुक्यातील एका सरपंच पतीस लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तथा एसीबी पथकाने रंगेहात पकडून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. हनुमंत पांडुरंग कोलते , (वय 43 वर्षे, व्यवसाय शेती) रा. रोहकल, ता. परांडा असे या सरपंच पतीचे नाव आहे.

तक्रारदार हे मेनकर एनर्जी प्रा. लिमिटेड कंपनी मध्ये साईट सुपर वायझर म्हणून नेमणूकीस आहेत आणि कंपनीचे जल जीवन मिशन अंतर्गत सौर उर्जेंवर आधारित दुहेरी पंप लघुनळ योजनेचे 18,00,000/- (अठरा लाख रुपये) किमतीचे काम रोहकल, ता. परांडा, ज़िल्हा धाराशिव येथील 3 वस्तीवर चालू असून यातील आरोपी हनुमंत पांडुरंग कोलते , वय 43 वर्षे, व्यवसाय शेती, सरपंच पती (खाजगी इसम ), रा. रोहाकल, ता. परांडा, यांनी सदर योजनेचे काम थांबवून ते पूर्ववत चालू करू देण्यासाठीयातील तक्रारदार यांना दिनांक 22/03/2023 रोजी चालू असलेल्या तीन्ही कामाचे प्रत्येकी 50,000/- रुपये प्रमाणे 1,50,000/- रुपये किंवा सोलरच्या तीन प्लेट व त्याचे साहित्य अश्या लाचेची मागणी पंचांसमक्ष करून तडजोडी अंती 1,00,000/- रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून आज दिनांक 23/03/2023 रोजी 1,00,000/- रुपये लाच रक्कम ज़िल्हा परिषद उपहार गृह उस्मानाबाद येथे पंचांसमक्ष स्विकारल्याने आरोपी यांना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन आनंदनगर, धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

हा सापळा एसीबीचे पोलीस उपाधीक्षक , त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल दिनकर उगलमुगले, इफ्तेकार शेख, सचिन शेवाळे, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर यांनी रचला होता .

Post a Comment

0 Comments