खुनाच्या आरोपातून पतीची निर्दोष मुक्तता ; बार्शी सत्र न्यायालयाचा निर्णय


बार्शी |

खुनाचे आरोपातुन पतीची निर्दोष मुक्तता अंजनगाव, ता. माढा येथे दिनांक १६/०६/२०१९ रोजी पत्नी कोमल हिचा डोक्यात फावडे घालून खुन केल्याचा आरोपावरुन पती बापु लक्ष्मण देवकुळे रा. अंजनगाव (खे), ता. माढा याच्याविरुध्द भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी बार्शीचे अति. सत्र न्यायाधीश श्री. जयेंद्र जगदाळे यांच्यासमोर होऊन न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली. या खटल्याची हकीकत अशी की, आरोपी बापु देवकुळे हा आपल्या कुटूंबासहीत अंजनगाव खेलोबा येथे राहत होता.

पत्नी कोमल हिच्याबरोबर त्याचे भांडण होत होते. घटनेदिवशी आरोपीने पत्नीबरोबर झालेल्या भांडणात तेथेच पडलेले फावडे तिच्या डोक्यात घालून खुन केला अशा आशयाची फिर्याद गावचे पोलीस पाटील अनिरुध्द पुरुषोत्तम पाटील यांनी माढा पोलीस स्टेशनला दिलेली होती. तपास पुर्ण झाल्यानंतर माढा पोलिसांनी आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले होते.


याप्रकरणी आरोपीला खोटेपणाने गुंतवण्यात आलेले आहे. आरोपीविरुध्द सरकारपक्षातर्फे सादर करण्यात आलेले पुरावे विश्वासार्ह्य नाही असा आरोपीपक्षातर्फे बचाव होता.
या खटल्यात आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने ,ॲड. शरद झालटे तर सरकारतर्फे ॲड. पी. ए. बोचरे यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments