धक्कादायक | फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर केला अत्याचार


बीड |

दोन वर्षांपूर्वी इंस्टाग्रामवर ओळख झाली होती त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले, मग फिरायला गेले. यानंतर तिला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आष्टी येथे एका हॉटेलवर तिच्यावर अत्याचार केला. याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून एका तरुणावर आष्टी पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एका गावातील तरुणाशी अहमदनगर जिल्ह्यातील एका तालुक्यातील एका २४ वर्षीय महिलेची ऑक्टोबर २०२१ मध्ये इंस्टाग्रामवर ओळख झाली.

ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मग ते दोघे भेटले. फिरायला गेले. यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आष्टी तालुक्यातील एका हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडितेने  एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments