युवती सेना तालुकाप्रमुख रजनी पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजन ; निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण व शैक्षणिक साहित्याचे वाटप...


पांगरी |

सावित्रीबाईंचा संघर्ष डोळ्यासमोर ठेवून आजच्या युगात नको त्या गोष्टींसाठी पैसा आणि वेळ वाया जात आहे, कोणी शैक्षणिक दृष्ट्या समाज कसा सक्षम होईल याकडे लक्ष देत नाही. मोबाईलच्या दुनियेत गुंग असणाऱ्या माणसाला शिक्षण क्षेत्रात काय चालले आहे. याची दखल घेणं होईना इतरांपेक्षा काहीतरी वेगळा उपक्रम राबवावा ज्यातून आज शिक्षण घेणारी पिढी समाजात उद्या नवीन क्रांती घडवून आणेल आणि युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता समाजाच्या कल्यानार्थ जगाव हा हिंदुरुदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा विचार डोळ्यासमोर ठेवून या निबंध स्पर्धेचे आयोजन केले. यातून मुलांच्या बुद्धीला चालना मिळवून त्यांचे विचार लेखणीने कागदावर उतरविले आणि हाच पाया आहे, जो उद्याचा सक्षम युवक म्हणून उभा असेल असे मत प्रास्ताविक मध्ये युवती सेना तालुकाप्रमुख रजनी पाटील यांनी व्यक्त केले.

युवती सेना जिल्हा प्रमुख अमृता उन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख रजनी पाटील यांचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. उद्घाटक व प्रमुख पाहुणे तालुकाप्रमुख प्रवीण काकडे, शहर प्रमुख दिनेश नाळे, उपतालुकाप्रमुख राजाभाऊ पाटील, महसूल विभागाच्य अनिता भोसले, सरपंच रेणुका मोरे, पत्रकार गणेश गोडसे, युवा सेना शहर प्रमुख सचिन चव्हाण, युवा सेना विद्यार्थी सेनेचे सर्व पदाधिकारी उपसरपंच यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जवळपास २७५ निबंध जमा झाले मोठा गट व लहान गट या बक्षीस वाटपासाठी प्रवीण काकडे व दिनेश नाळे यांचा सहकार्य लाभलं, अशी माहिती रजनी पाटील यांनी दिली सूत्रसंचालन नितीन भोसले यांनी तर आभार रजनी पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments