जामगाव (पा) येथे शिवजयंतीनिमित्त माता-पिता पूजनाचा कार्यक्रम ; गावकऱ्यांनी नोंदवला मोठ्या संख्येने सहभाग



बार्शी |

मानवता संयुक्त संघ व योगवेदांत सेवा समिती बार्शी यांच्या संयुक्त विद्यमानाने जामगाव पां येथे घेण्यात आलेल्या माता-पिता पूजन या कार्यक्रमात गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

जामगाव येथील पाच शाळेचे तसेच शिवशक्ती बहुउद्देशीय सेवा संस्था यांचे संस्थापक असलेले शिवाजी केरबा संगपाळ यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत त्यांच्या संस्थेतील शिक्षकांना किमान तीन पालकांचा रोज या विधीप्रमाणे पूजन व्हावे असा शिक्षकांना सल्ला त्यांनी शिक्षकांना दिला, तसेच आज छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव त्यानिमित्ताने हा कार्यक्रम आपण घेत आहोत, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकून वाचून डोळे नुसते दिप्ता कामा नये तर तो विचारात आणि डोळ्यात सतत राहिला पाहिजे. शिवाजी महाराजांनी ही  आई-वडिलांची खूप सेवा केली होती,आज या पद्धतीच्या संस्कारमय कार्यक्रमाची सर्व गावात व  शाळेवर आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. 


माता पिता पूजन विधियुक्त पूजनाचे मार्गदर्शन करताना मानवता संयुक्त संघाचे जिल्हाध्यक्ष विजय कोरे हे म्हणाले की, स्वतःच्या कल्याणाच्या गोष्टी काही लोक या कानाने ऐकतात व दुसऱ्या कानाने सोडून देतात काही लोक या कानाने ऐकतात व ते दुसऱ्यांना उपदेश करतात पण आपल्या आचरणात किंवा व्यवहारात आणत नाही आणि काही लोक स्वतःच्या कल्याणाच्या गोष्टी या कानाने ऐकतात आणि आचरणात व व्यवहारात पण  आणतात  अशी लोक मुले विद्यार्थी आयुष्यात सर्वश्रेष्ठ ठरतात.
अशा पद्धतीने त्यांचे कल्याण होऊन जाते. कार्यक्रमाचे आयोजन योग वेदांत सेवा समिती बार्शी व योग वेदांत सेवा समिती जामगाव पा या सर्व टीमने केले होते,या कार्यक्रमाचे कौतुक संपूर्ण गावात विद्यार्थी व पालकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments