बार्शी तालुक्यातील सर्जापूर येथे अवैध सावकारकी अंतर्गत धाड



बार्शी |

बार्शी तालुक्यातील वैराग  भागातील सर्जापूर येथील नितीन गोरख राऊत यांच्या राहत्या घरी बार्शी तालुक्याचे सहाय्यक निबंधक जे एस दडस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धनाजी ज्ञानोबा माने( उत्तर सोलापूर) यांचे कडील तक्रारी अनुषंगाने अवैध सावकार की अंतर्गत धाड टाकली यावेळी

घर जडतीमध्ये पथकाकडून कोरे चेक कोरे स्टॅम्प खरेदी खते व आर्थिक नोंदी असलेल्या वह्या इत्यादी कागदपत्रे जप्त करण्यात आली चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषींवर  महाराष्ट्र सावकारी (नियमन )अधिनियम२०१४  नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल ही धाडीची कारवाई सहाय्यक निबंधक कार्यालयातील सचिन महाडिक सौ पी आर स्कंद, उमेश मुसळे, व्ही जे गौड, सुहास राऊत, व प्रांजली झालटे, तर वैराग पोलीस ठाणे येथील ए आर अवघडे, एम एस सलगर, जी बी जाधवर ,या कर्मचाऱ्यांनी केली

Post a Comment

0 Comments