बार्शी |
बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या प्रयत्नांना यश,तालुक्यातील १२ गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशन योजने अंतर्गत ९ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाला आहे.
जल जीवन मिशन योजनेअंतर्गत बार्शी तालुक्यातील गावांना नळ पाणीपुरवठा योजनेसाठी ९ कोटी ५० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे या गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.या योजनेसाठी निधी मिळविण्यात आमदार राजाभाऊ राऊत यांना यश आले आहे.
या योजनेमुळे बार्शी तालुक्यातील सर्व नागरिकांना 55 लिटर दरडोई याप्रमाणे पाणी मिळणार आहे.लवकरच निविदा प्रक्रिया पार पडून कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे अशी माहिती आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली.अनेक योजनांमध्ये विविध गावे वंचित राहिल्याने त्यांना विविध योजनांचा लाभ मिळू शकला नाही,परंतु आमदार राजाभाऊ राऊत यांनी नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल,या अनुषंगाने सरकारकडून योजना मंजूर करून घेतल्या,आमदार राजाभाऊ राऊत यांनी सतत पाठपुरावा करून सरकारकडून या योजना मंजूर करून घेतल्या,त्यांच्या प्रयत्नांची दखल घेऊन पाणीपुरवठा विभागाने या योजना मंजूर केल्या आहेत.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या निर्णयानुसार ५ कोटींपर्यंत मर्यादेपर्यंत उत्पन्नाच्या खर्चाच्या निकषात बसणाऱ्या स्वतंत्र व प्रादेशिक योजनांना प्रशासकीय मान्यतेचे अधिकार जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन असल्याने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा व पाणी स्वच्छता मिशन सोलापूर यांनी या योजनेसाठी मंजुरी दिली आहे. या योजनेत भालगाव, गाडेगाव, पांगरी, नारी, खामगाव, निंबळक बोरगाव(खू), तुर्कपिंपरी, सासुरे, पिंपरी(आर),कासारवाडी,उपळे दुमाला आदी गावांचा समावेश आहे.
आमदार राजाभाऊ राऊत राऊत यांनी बार्शीच्या विकासासाठी आजपर्यंत विविध योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे.
0 Comments