अभिनेता रितेश देशमुख हा बॉलीवुडमधील एक सशक्त मराठी चेहरा आहे. हाऊसफुल सिरिज, हे बेबी, लय भारी, एक व्हिलन, तेरे नाल लव हो गया अशा अनेक चित्रपटांमध्ये रितेशने उत्तम अभिनय केला आहे. त्याने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आहे. तो सोशल मिडियावर बराच सक्रिय असतो. शिवाय तो अनई त्याची पत्नी जेनेलिया ही सर्वाधिक लोकप्रिय जोडी आहे.
ते दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचदा एकत्र
येत आपले प्रेम व्यक्त करत असतात. पण आज नात्याला वीस वर्षे होऊनही रितेश जेनेलीयासाठी तितकाच वेडा आहे. आज रितेशचा वाढदिवस, त्या निमित्ताने जाणून घेऊया काय आहे या प्रेमामागचं खरं कारण..
रितेश आणि जेनेलीया यांच्या नात्याला वीस वर्षे झाली. ते आधी 10 वर्षे रिलेशनशिप मध्ये होते मग त्यांनी लग्न केलं अनई आता त्यांच्या लग्नालाही 10 वर्षे झाली आहेत. या वीस वर्षांच्या नात्यात त्यांचे प्रेम गुंजभरही कमी झालेले नाही, उलट वाढतच आहे. बॉलीवुडमध्ये नातेसंबंध धाब्यावर बसवले जात असतानाच वीस वर्षे नाते टिकवल्याने त्या दोघांकडे प्रचंड आदराने पाहिले जाते. त्यामुळे एका मुलाखतीत रितेशला या प्रेमाचं गुपित विचारलं होतं, त्यावर रितेशने एक भन्नाट उत्तरही दिलं होतं..
या मुलाखतीत टो म्हणाला होता की," जेनेलीयाची साथ मला लाभणं हा मला मिळेलेला मोठा आशीर्वाद आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आम्ही दोघांनी एकत्र मिळून आनंद,दुःख, संकटं, हसणं, रडणं, भीती, अडचणी अशा सगळ्या गोष्टींनी भारलेला प्रवास केला आहे. ती माझ्यासोबत असली की मी जगातील कुठलीही अशक्य गोष्ट सहज शक्य करू शकतो हा विश्वास मला मिळतो. म्हणूनच सहजीवनाची वीस वर्षे कशी गेली कळलं नाही.आम्ही रोज नव्याने एकमेकांना भेटतो आणि रोज नव्याने प्रेमात पडतो.
रितेश-जेनेलियाची लव्हस्टोरीही इंटरेस्टिंग आहे. रितेश आणि जेनेलीया एका चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान एकत्र भेटले होते. रितेश तिला पाहताच तिच्या प्रेमात पडला तर जेनेलीया ही रितेशच्या साधेपणाच्या प्रेमात पडली. वडील मुख्यमंत्री असतानाही रितेश अत्यंत साधेपणाने वावरत होता. पुढे त्यांची छान मैत्री झाली आणि मग हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाल्यावर तब्बल 10 वर्षे ते एकत्र होते. २०१२ मध्ये एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली.
0 Comments