करमाळा |
करमाळा तालुक्यातील केडगाव येथे पूर्वीचे भांडण तसेच पैशाच्या वादातून एका तरुणाला दुचाकीला दोरीने बांधून फरफटत नेऊन चाकूने मारहाण करीत खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकरणात करमाळ्याच्या पोलिसांनी रेवणनाथ अंकुश मारकड (रा.चिखलठाण ता.करमाळा) याच्यासह तिघा विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अभिजीत दासू करे (वय २० रा.कोंडेज ता. करमाळा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अभिजीत करे आणि आरोपी मारकड यांच्यात व्यवसायातील पैशाच्या वाद तसेच पूर्वीचे भांडण होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास मारकड याने अभिजीतला केडगाव येथील कॅम्प रस्त्यावर बोलवले होते. त्याप्रमाणे आभिजीत घटना स्थळी आला होता. तेव्हा मारकड याच्यासह तिघांनी याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला दुचाकीला दोरीन बांधून फरपटत उसाच्या शेतात नेले. आणि त्याला चाकूने वार करून गंभीर जखमी करून पसार झाले. अशी नोंद करमाळा पोलिसात झाली.
0 Comments