बॉलिवूडमधील स्टार कपल आणि महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजे रितेश आणि जेनेलिया देशमुख. रितेश आणि जेनेलिया यांचा 'वेड' हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटला येणार आहे. नुकताच या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. रितेश आणि जेनेलिया बऱ्याच वर्षांनी एकत्र काम करताना दिसणार आहेत.
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर रितेश देशमुखने 'वेड' या चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासून या चित्रपटाची चर्च होत आहे. या चित्रपटातील रितेश आणि जेनेलिया यांचा फर्स्ट लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. 'वेड' हा चित्रपट एकतर्फी प्रेमावर आधारित आहे.
आज वेड चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. ‘वेड' चित्रपटाच्या ट्रेलरची सुरूवात रितेश आणि जिया शंकर यांच्या संवादाने होते. त्यानंतर चित्रपाटातील ‘जीव उतावीळ' या गाण्यावर चित्रपटातील काही रोमँटिक भाग दाखविण्यात आला आहे. रितेश आणि जेनेलिया यांचे लग्न आणि जेनेलियाने रितेशवरील एकतर्फी प्रेम यांची कथा या चित्रपटामध्ये दाखविण्यात आली आहे.
‘वेड’ चित्रपटातून रितेश दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. जेनेलिया सुद्धा या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटामध्ये पदार्पण करत आहे. तसेच जेनेलिया या चित्रपटाची निर्माती देखील आहे. 'लय भारी' या चित्रपटातील ‘धुवून टाक' गाण्यावर जेनेलियाने डान्स केला होता. मुंबई फिल्म कंपनी या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात अली आहे.
‘वेड चित्रपट ३० डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. रितेश, जेनेलिया आणि जिया शंकरसह या चित्रपटामध्ये अशोक सराफ, शुभंकर तावडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अजय-अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे.
0 Comments