कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नासाठी राज्यातील दोन मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही मंत्री 6 डिसेंबरला कर्नाटकातील बेळगावला भेट देणार आहेत. मात्र, त्याआधीच कर्नाटकाचे मुख्यमंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलं असून महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना कर्नाटकात पाठवू नका, असा संदेश दिला आहे. त्यामुळे हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.
सीमावादाचा प्रश्न चांगलाच पेटण्याची शक्यता आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा बोंबाबोंब सुरू केलीय. महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये असा इशारा बोम्मईंनी दिला आहे. सीमावादाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह इतर मंत्री उद्या बेळगावचा दौरा करणार आहेत. मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये असं सांगत पुन्हा एकदा कुरघोडीचा प्रयत्न केलाय. दरम्यान, सोलापुरात उभारण्यात येणाऱ्या कन्नड भवनासाठी 10 कोटी रुपये देण्याची घोषणा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा
तर महाराष्ट्राचे सीमा भाग समनव्य मंत्री चंद्रकांत पाटील आणि इतर मंत्र्यानाही कर्नाटकमध्ये येवू नये यासाठी कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र पाठविलं आहे. कर्नाटकमधील रामदुर्गमधल्या साळहल्ली इथं पत्रकाराशी बोलताना बोम्मई यांनी हा इशारा दिला आहे. सध्याची दोन्ही राज्यातील परिस्थिती पाहता चंद्रकांत पाटील यांनी बेळगावला येवू नये अशी विनंती त्या पत्रात उल्लेख असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे.
0 Comments