बार्शी | बार्शी तालुक्यातील येडेश्वरी शुगर (कुमुदा आर्यन) या साखर कारखान्यासमोर सन २०१४-०१५ या वर्षातील शेतकऱ्यांची थकलेली ऊस बिले एफ.आर.पी. अधिक व्याज अशी देण्यात यावी, वाहनधारकांची थकलेली बिले देण्यात यावी आदी मागण्यासाठी शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली मागील दोन दिवसापासून शेतकऱ्यांनी येडेश्वरी साखर कारखान्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले असून त्यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले की, मागील अनेक दिवसापासून या ठिकाणी आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत परंतु शेतकऱ्यांची थकलेली ऊस बिले व वाहनधारकांचे पैसे अद्याप पर्यंत मिळालेले नाहीत त्यामुळे आम्ही नाव विलाजाने कायदा हातामध्ये घेऊन सुरू असलेले कारखान्याचे काम बंद पाडून कायद्याची पायमल्ली थांबवणार आहोत, त्याचबरोबर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांनी या घटनेमध्ये लक्ष घालून या कारखान्याची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा असेही यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना गायकवाड म्हणाले. त्यावेळी सचिन आगलावे, सतीश पाटील, हेमंत देशमुख, बाळासाहेब राठोड, रवींद्र मुठाळ, सुरेश राठोड, चंद्रकांत खताळ, दयानंद राठोड, चंद्रकांत गुंजाळ, नामदेव सुरवसे, विशाल क्षीरसागर, बाळू राठोड, देविदास राठोड, समाधान भालेकर, अमर पाटील, संभाजी धुमाळ, विठ्ठल निर्मळ, रमेश फोपले, आयुब पठाण, सुग्रीव भोसले, नामदेव जाधव, आप्पासाहेब ढाळे, बाबासाहेब मुंढे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. आंदोलनाचा चोख पोलीस बंदोबस्त पांगरी पोलीस स्टेशनच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे.
फोटो ओळी: छायाचित्रात आंदोलनासाठी बसलेले शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष शंकर गायकवाड व त्यांचे समवेत विविध तालुक्यातील शेतकरी दिसत आहेत.
0 Comments