'या'प्रकरणी आमदार पुत्रासह सात जनावर गुन्हा दाखल



बार्शी |

तुर्कपिंपरी (ता. बार्शी) येथील इंडियन शुगर्स साखर
कारखान्याने सभासद असलेल्या शेतकऱ्याच्या नावावर परस्पर कर्ज काढून त्या कर्जाची रक्कम मागील वर्षीच्या ऊसबिलातून परस्पर बँकेत भरली. यानंतर शेतकऱ्याला फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी बार्शी न्यायालयात धाव घेतली.

 याप्रकरणी कारखान्याच्या चेअरमनसह सात जणांविरोधात वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. सबनीस यांनी दिले आहेत. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र तथा कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, व्यवस्थापक कैलास मते, विजयकुमार धनवे, औदुंबर कदम, सुहास बुरगुटे व अन्य दोघेजण, अशा सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments