संसदेच्या आवारात कंगनाला करायचे आहे 'इमर्जन्सी' सिनेमाचे शूटिंग



बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचा आगामी चित्रपट 'इमर्जन्सी' सध्या चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून वेळ आहे, मात्र त्याआधी चित्रपटाचा टीझर आणि महत्वाच्या कलाकारांचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटातील अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेते अनुपम खेर, श्रेयश तळपदे यांचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

दरम्यान, संसदेच्या आवारात शूटिंग किंवा व्हिडिओग्राफी करण्याची परवानगी नसते. हे शूटिंग कोणत्या अधिकृत सरकारी कामासाठी केले जात असेल तर ती वेगळी बाब आहे. प्रामुख्याने दूरदर्शन आणि संसद टीव्ही यांनाच संसदेच्या आवारात चित्रीकरणाची करण्याची परवानगी आहे. त्यामुळे आता कंगना राणावतला चित्रपटाच्या शूटिंगसाठी परवानगी मिळणार का? हे पाहणे महत्वाचे आहे. शिवाय या परिसरात चित्रीकरणाची तिला परवानगी मिळाली तर याचे राजकीय पडसादसुद्धा उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

युजर्सना चित्रपटाची कास्टिंग आवडली...
अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत श्रेयस तळपदेची भूमिका लोकांना पसंत पडत आहे. चाहते उत्कृष्ट, काय निवड, सर्वोत्तम निवड अशा कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले,'व्वा, आणीबाणीसाठी सर्व महान कलाकार एकत्र आले. तर दुसऱ्याने लिहिले आहे, आशा आहे की श्रेयस तळपदे अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत धमाल करेल' इमर्जन्सी चित्रपटाची स्टारकास्ट लाजवाब असल्याचे लोक म्हणतात. लोक कंगनाचे कौतुक करत आहेत. चित्रपटासाठी एवढ्या चांगल्या कलाकारांची निवड केली.

अनुपम खेर 'लोकनायक'
अनुपम खेर हे बॉलीवूडच्या काही नामांकित आणि उत्तम अभिनेत्यांपैकी एक आहेत, जे आपल्या प्रत्येक पात्राला पूर्णपणे निभावतात. 'इमर्जन्सी'मधला त्यांचा लूक पाहता या चित्रपटात आपल्या भूमिकेने ते नवा इतिहास रचणार आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कंगनाच्या चित्रपटात अनुपम खेर क्रांतिकारी नेते जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Post a Comment

0 Comments