डायऱ्यांच्या प्रेमातील जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना रेखाचित्र भेट



भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आणि महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या माझ्या "ज्यांनी आभाळ कवेत घेतलं.." या पुस्तकातील एक मानकरी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेद्र भोसले यांना त्यांच्या व्यक्तिचित्राची फ्रेम मी भेट दिली.ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे यांनी पुस्तकातील ७५ दिग्गजांची व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत.

परवा अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असताना डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे उपाध्यक्ष कवी किशोर मरकड यांच्या कार्यालयात पुस्तक व फ्रेम त्यांना भेट देण्यात आली.यावेळी किशोर मरकड यांनी डॉ.भोसले ,माझा व माझी पत्नी सौ.मंदाचा पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देवून सत्कार केला.
-#राजा माने,
#संपादक, राजकीय #विश्लेषक व माध्यम तज्ज्ञ.
#अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.
-#प्रदेशाध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडिया, #महाराष्ट्र.

Post a Comment

0 Comments