सांगोला |
सोशल मीडियामुळे देशात रातोरात स्टार बनलेली अनेक उदाहरणे आहेत. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटीलही सोशल मीडियामुळे देश-विदेशांत पोहोचले. बापूंची सारीच भाषणं कुठे ना कुठे व्हायरल होत असतात. या व्हिडीओवर बापूंना चांगल्या-वाईट कॉमेंटही येतात. मात्र बापूंच्या विरोधकांनी आता त्यांची जुनी व्यक्तिगत प्रकरणे समाजमाध्यमांवर पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे.
शहाजीबापूंचे समर्थक आणि पंचायत समितीचे माजी सदस्य अॅड. बंडू काशीद यांनी आता बापूंच्या वतीने नेटकऱ्यांना चक्कम दम भरला आहे. बापूंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट अथवा लिखाण करणाऱ्यांना थेट कोर्टात खेच, असा सज्जड दमही त्यांनी दिला आहे. पण ज्या सोशल मीडियामुळे शहाजीबापू रातोरात स्टार झाले त्याच मीडियाची भीती आता त्यांना वाटू लागली आहे, अशी चर्चा आहे.
0 Comments