बार्शी |
बार्शी शहरातील ढगे मळा येथे आमदार फंडातून माळी समाजासाठी 20 लाख रुपयांच्या सभामंडपाचे भुमिपुजन बार्शी तालुक्याचे विकासरत्न आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते पार पडले.
आमदार राजाभाऊ राऊत यांनी बार्शी तालुक्यातील माळी समाजाच्या भावना लक्षात घेऊन आपल्या आमदार फंडातून संत शिरोमणी श्री सावता महाराज माळी समाज सभा मंडपासाठी वीस लाख रुपये मंजूर केलेले आहेत.तो सभामंडप बार्शी नगरपालिकेतील ढगे मळा येथे बांधण्याचा निर्णय घेतला, आमदार राजाभाऊ राऊत यांच्यावरती माळी समाजाचे असणारे प्रेम व आपण राजकारण करत असताना माळी समाजाचे कुठेतरी देणे लागतो म्हणून तालुक्यामधील माळी समाजाला एकत्र येण्यासाठी आपल्या आमदार फंडातून संत शिरोमणी श्री सावता महाराज माळी समाजासाठी सभामंडप बांधण्याचा निर्णय घेतला.
यावेळी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी,माजी नगराध्यक्ष रमेश(अण्णा)पाटील, पांगरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने, नगरसेवक विलास (आप्पा)रेणके,उद्योजक प्रशांत कथले मालक,नगरसेवक रमाकांत सुर्वे, उद्योजक वासुदेव(बापू)ढगे, रेखा शिवाजी नाळे, राजामती लक्ष्मण ढगे तसेच इतर प्रमुख मान्यवर व माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..
0 Comments