बार्शी |
लोकांना बँक/ए.टी.एम जवळ थांबुन तुमचे पैसे पडले आहेत असे भासवुन खाली नोटा टाकुन त्यांचे गाडीला अडकवलेली किंवा गाडीत ठेवलेली पैशाची बॅग चोरून घेवुन जाणारी टोळी जेलबंद करण्यात बार्शी शहर पोलींसांना यश त्यात चार पुरुष आरोपीस अटक भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. बजरंग नागनाथ जाधव वय ७० वर्षे धंदा व्यवसाय रा. ३५१५ राउळ गल्ली बार्शी ता. बार्शी जि. सोलापूर यांनी फिर्याद दिली होती.
तेलगिरणी चौकातील मिरगणे कॉम्प्लेक्स शेजारी असलेले सेंट्रल बँक ऑफ इंडीया या बँकेत FD वर कर्ज काढणेसाठी गेले असता त्यांनी तेथुन ५०,००० रुपये १०० रुपये दराच्या १०,०००रु चे पाच बंडल असे रोख रक्कम घेवुन जात असताना फिर्यादीचे समोरुन दोन अनोखळी व्यक्ती आले व त्यातील एका व्यक्तीने फिर्यादीचे दंडास धक्का देवुन तुमचे पैसे पडले आहेत असे म्हणल्याने फिर्यादीने गाडीवरुन उतरुन गेटच्या आत येवुन पाहीले असता फिर्यादीस तेथे शंभर रुपयाची एक नोट व बीस बीस च्या नोटा पडलेल्या दिसल्या सदर नोटा घेण्यासाठी फिर्यादी खाली वाकले व तेथिल नोटा घेवुन मोटार सायकलकडे आले त्यावेळी फिर्यादीचे मोटार सायकलचे पुढील बाजुला अडकवलेली कागदी पिशवी पाहीली असता असे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचे संमती वाचुन मुददाम लबाडीने चोरून नेले आहेत.
वगैरे मजकुरची सविस्तर फिर्याद दिल्याने ती वरील प्रमाणे रजि. दाखल आहे. दिनांक ०२/११/२०२२ रोजी लोकांना बँक / ए. टी. एम जवळ थांबुन तुमचे पैसे पडले
आहेत असे भासवुन खाली नोटा टाकुन या सदर नोटा घेण्यासाठी जाणारे लोकांना फसवुन त्यांचे गाडीला अडकवलेली किंवा गाडीत ठेवलेली पैशाची बॅग चोरून घेवुन जाणारे लोकांची बार्शी शहर पोलींसाना मिळालेल्या गोपनिय बातमीप्रमाणे केलेल्या करावाई नुसार यातील १) राजेश रामलाल साळुंखे वय ६० वर्षे रा. शुक्रवार पेठ खर्डा ता. जामखेड जि. अहमदनगर २) बन्सी उमाजी भोसले वय
५८ वर्षे रा. चिचोंडी पाटील ता. जि. अहमदनगर ३) आकाश हुकुम बडगुजर वय ३५ वर्षे रा. नवा मोंडा
परळी ता. परळी जि. बिड ४) जयेंद्र दिलीप परमाळ वय २७ वर्षे रा. माळी वाडी ता. जि. यांना तेलगिरणी
चौकातील मिरगणे कॉम्प्लेक्स शेजारी असलेले सेंट्रल बँक ऑफ इंडीया येथुन ताब्यात घेतले असता घटनेचे गंर्भीय लक्षात घेवुन त्यांना पोलीस ठाणेस आणुन चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली तसेच अशाचे प्रकारचे गुन्हे पंढरपुर शहर पोलीस ठाणे, टेभुंर्णी पोलीस ठाणे सोलापुर ग्रमीण तसेच बिड जिल्हयाचे हददीत केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी हे सध्या बार्शी सबजेल येथे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव , उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूल, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, सपोनि सुधीर तोरडमल, सपोफौ अजित वरपे, शैलेश चौगुले, मनिष पवार, वैभव ठेंगल, ज्ञानेश्वर घोंगडे, अविनाश पवार, अर्जुन गोसावी, सचिन देशमुख, अंकुश जाधव यांनी केली आहे.
0 Comments