बार्शी |
बार्शी पोलिसांनी केलेली कारवाईची एफआयआर नोंद झाली आहे. बार्शी शहर हद्दीत गांजा ओढणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. शैलेश नागेश भोंडे (वय 37 वर्षे, रा सुभाष नगर, बार्शी शहर, जि सोलापूर) व दशरथ नंदू पेठाडे (टा, चोरमले फ्लॅट, बार्शी शहर, जि सोलापूर) यांवर गुन्हा दाखल झाला आहे.या दोघांकडून एकूण दहा रुपयांचा मुद्देमाल म्हणजेच गांजा ओढणारी मातीची चिलीम जप्त करण्यात आली आहे. एका चिलीमची किंमत पाच रुपये लावली गेली आहे. या दोघांवर गुंगीकारक औषध आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 नुसार कारवाई करण्यात आली आहे.
बार्शी शहर पोलीस ठाण्यातील डीबी पथकाची कारवाई -
बार्शी शहर पोलीस ठाण्यातील डीबी पथक 28 नोव्हेंबर रोजी पेट्रोलिंग करत होते. यावेळी एका गुप्त बातमीदाराने माहिती दिली की, आगळगाव रोड वर काही लोक गांजा ओढत बसले आहेत. त्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. यावेळी शैलेश भोंडे यास ताब्यात घेऊन त्याकडे असलेली पाच रुपयांची मातीची चिमणी जप्त करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल अंकुश जाधव यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
पाच रुपयांची मातीची चिमणी जप्त करून कारवाई-
28 नोव्हेंबर 2022 रोजी बार्शी शहर पोलीस ठाण्यातील डीबी पथक अवैध धंद्यावर कारवाई साठी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी एका गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की,बार्शी सोलापूर रोड वर असलेल्या एका उद्यानाजवळ काही इसम गांजा ओढत आहेत. डीबी पथकाने ताबडतोब त्याठिकाणी जाऊन प्रतिबंधात्मक कारवाई करत दशरथ नंदू पठाडे(वय 20 वर्ष,रा, चोममोले प्लॉट , बार्शी, जि सोलापूर) यावर कारवाई केली. त्याकडून पाच रुपयांची मातीची चिलीम जप्त करून बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments