मुंबई |
मेट्रोमोनी साईटवर आपली खोटी माहिती टाकून महिलांना विवाहाचे अमिष दाखवून त्यांचा शाररिक उपभोग घेत त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सराईत भामट्याला कळवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी राजेश उर्फ राज देशमुख उर्फ रुपेश शिवाजी यशवंतराव याने अनेक महिलांना गंडा घातलेला आहे. कालवा पोलीस त्याने आतापर्यंत किती महिलांना गंडा घातला याची चौकशी करीत असलायची माहिती कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी दिली.
अटक आरोपी राजेश उर्फ राज देशमुख उर्फ रुपेश शिवाजी यशवंतराव याने अनेक महिलांना घटस्फोटित असल्याचे सांगून त्यांचा शाररिक उपभोग घेतला आणि आर्थिक गंडही घातल्याची तक्रार कळवा पोलीस ठाण्यात नोंदविली. महिलेने आरोपी राजेश उर्फ राज देशमुख उर्फ रुपेश शिवाजी यशवंतराव(४२) याने २०१८ साली महिलेला आपण घटस्फोटित असल्याचे सांगून मैतीरी केली आणि विश्वासही संपादन केला. महिलेला लग्नाचे अमिश दाखवून वेळोवेळी तिच्याशी शाररिक संबंध ठेवले. आणि गरज असलयाचे सांगत वेळोवेळी महिलेकडून तब्बल १३ लाख ६० हजार रुपये घेतले आणि फसवणूक केली. आरोपी राजेश उर्फ राज देशमुख उर्फ रुपेश शिवाजी यशवंतराव हा आपल्या राहण्याची ठिकाणी वारंवार बदलत होता. त्यामुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकत नव्हता अनेक नावाने त्याने मेट्रोमोनीवर आपली नोंद केल्याची माहिती समोर आलेली असल्याचे समोर आले. कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी या गुन्ह्याचा उलघडा करण्यासाठी पथक तयार करून तपासाला सुरुवात करण्यासाठी मार्गदर्शन केले. आरोपीचा कुठलाही थांगपत्ता नसल्याने कळवा पोलीस पथकापुढे आव्हान निर्माण झाले. मात्र खबऱ्याच्या नेटवर्क आणि चौकशीत आरोपी कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी या गुन्ह्याचा उलघडा करण्यासाठी पथक तयार करून तपासाला सुरुवात करण्यासाठी मार्गदर्शन केले. हा ठाण्यातील आणि भिवंडी काल्हेर गाव आयेथे राहत असलायची माहिती मिळाली. पोलीस पथकाने तांत्रिक अभ्यास करीत आरोपीचा शहापूर, काल्हेर, भिवंडी ठाणे अशा विविध ठिकाणी त्याचा कसोशीने शोध घेत अखेर अटक केली. त्याच्या अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तर अशा प्रकारे अनेक गुन्हे केल्याची माहितीही पोलिसांना प्राप्त झाली. कळवा पोलिसांनी या आरोपीच्या विरोधात सोशल मीडियाच्या मदतीने लग्नाचे आमिष दाखवणे, महिलांची आर्थिक फसवणूक, जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीने अनेक महिलांना गंडा घातल्याचे फसवणूक केल्याच्या प्रकारची चौकशी कळवा पोलीस करीत आहेत. पोलीस आता आरोपी राजेश उर्फ राज देशमुख उर्फ रुपेश शिवाजी यशवंतराव याने आतापर्यंत किती घटस्फोटित महिलांची फसवणूक केली? आणि एकूण किती लाखांची आर्थिक फसवणूक केली आहे याचा तपास करीत आहेत.
0 Comments