मुंबई |
मराठा समाज मुलीचे वस्तीगृह बांधण्यासाठी भूखंड मिळावा या मागणीसाठी महसूल मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीला आमदार राजेंद्र राऊत हे उपस्थित होते.
मराठा समाजातील गरीब अल्पभूधारक शेतकरी आणि कष्टकरी मराठा कुटुंबातील मुलींना सोलापूर शहरात शिक्षणासाठी आल्यानंतर त्यांच्या निवासाची व्यवस्था होत नसल्यामुळे बरेच पालक आपल्या मुलींना शहरात शिक्षणासाठी पाठवत नाहीत परिणामी त्यांचे शिक्षण अर्धवट राहते. ही समाजाची गरज लक्षात घेवून मोफत किंवा नाममात्र पैशात मुलींच्या राहण्याची सोय करण्यासाठी शहरात मध्यवर्ती ठिकाणी जागा मिळणे गरजेचे आहे. या मागणीसाठी आमदार राजेंद्र राऊत गेल्या अनेक दिवसापासून आग्रही आहेत.
सकल मराठा समाज सोलापूरचे समन्वयक आणि महसूल मंत्री यांच्यात चर्चा घडवून आणली आणि वसतिगृहाची आवश्यकता मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. वास्तविक पाहता समाजाची ही मागणी जुनीच असून समाजाला अद्याप न्याय मिळाला नाही, तो न्याय मिळवून देण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत हे प्रयत्नशील आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महसूल उपसचिव श्रीराम यादव, सकल मराठा ट्रस्टचे माऊली पवार, राजा माने साहेब, दत्तामामा मुळे इत्यादी मंडळी उपस्थित होते.
0 Comments