"हिंदु मुलाचे मुस्लिम मुलीसोबत अफेअर; जमावा कडून तरुणाचा खून..."



नांदेड |

मराठवाड्यातील नांदेडमध्ये एक हिंदू धर्मिय  मुलगा आणि मुस्लिम मुलगी यांच्यात प्रेमसंबंध होते. परंतु हे प्रकरण काहींना रुचलं नाही. लाठ्या-काठ्यांनी त्या तरुणाला इतकं मारलं की त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.

दोन वेगवेगळ्या धर्मातील प्रेमाला कायम विरोध होतो. पण एका प्रकरणात जमावाने लाठ्या-काठ्यांनी मारुन तरुणाचा जीव घेतला. ही धक्कादायक घटना महाराष्ट्रात घडली आहे.

मृत तरुणाचं नाव स्वप्नील होतं. या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तर तिघांचा पोलिस शोध घेत आहेत. दहा जणांनी मिळून स्वप्नीलला रॉड आणि काठ्यांनी मारहाण केली होती. हे सगळे आरोपी संबंधीत तरुणीचे नातेवाईक होते की नाही, याबाबत पोलिस तपास करीत आहेत. नांदेडचे डीएसपी चंद्रावन देशमुख यांनी माध्यमांना ही माहिती दिली.

पोलिसांनी सांगितलं की, २३ नोव्हेंबर रोजी स्वप्नील नावाच्या तरुणाची हत्या झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तातडीने तपास करीत सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना अटक केली. आतापर्यंत सात जणांना अटक केलेली आहे. उर्वरित आरोपींना आम्ही लवकरच अटक करु. सध्या या प्रेम प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Post a Comment

0 Comments