मुंबई येथून अपहरण केली एक वर्षाची बालिका दोन महिलेसह सोलापूर रेल्वे पोलीसानी ४८ तासात घेतले ताब्यात, दोन्ही महिलांचा बालिकेला विक्रीचा होता बेत

सोलापूर |

मुंबई येथून एक वर्षाच्या बालिकेला विक्रीसाठी घेऊन जाताना सोलापूर रेल्वे पोलिसांनी दोन महिलांना पकडले. अवघ्या 48 तासात मुंबई येथून अपहरण झालेल्या एक वर्ष बालिकेला सोलापूर रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. 

हुसेन सागर एक्सप्रेस मधून हैदराबादहून मुंबईच्या दिशेने येताना हुसेन सागर एक्सप्रेस सोलापूर स्थानक आली होती. सोलापूर रेल्वे पोलिसांना त्याबद्दल माहिती मिळाली. सोलापूर आरपीएफ जवानांनी हुसेन सागर एक्सप्रेस ही गाडी तपासली असतात. जनरल डब्यामध्ये दोन महिला एका बलिकेला घेऊन बसल्या होत्या. तिकीट चेक करण्याच्या बहाने दोन्ही महिलांना खाली उतरवण्यात आली. सदर बालिकेला ताब्यात घेतले. याबाबत मुंबई येथील वांद्रे रेल्वे पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई येथील वांद्रा रेल्वे स्थानकावर झोपलेल्या एक वर्ष बालिकेला दोन महिलांनी उचलून घेऊन अपहरण केले होते. सदर बालिकेला विकण्यासाठी मुंबईवरून हैदराबाद येथे आणण्यात आले. हैदराबाद या ठिकाणी विक्रीचा प्रयत्न फसल्यामुळे सदर दोन्हीही महिला हुसेन सागर एक्सप्रेसने हैदराबादकडे मुंबईकडे निघाल्या होत्या. सोलापूर रेल्वे जवानांना याबाबत टीप मिळाली. हुसेन सागरी सकाळी चार क्रमांक प्लॅटफॉर्मवर आली. सर्व गाडीची तपासणी केल्यानंतर शेवटी असणाऱ्या जनरल डब्यामध्ये दोन महिला एका घेऊन बसलेचे दिसून आले. विना तिकीट प्रवास करणाऱ्या त्या दोन्ही महिलांना खाली उतरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली व सदर बालिकेस ताब्यात घेऊन मुंबई रेल्वे रेल्वे पोलिसांकडे देण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments