बार्शी | ताडसौंदणे शिवारात उसाच्या फडाला आग; शेतकऱ्याचे दोन लाखाचे नुकसान


बार्शी |

बार्शी तालुक्यातील ताडसौंदणे शिवारामध्ये ११ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री साडे अकराच्या दरम्यान राहुल तानाजी पाटील (वय ३५) रा. ताडसौंदणे ता. बार्शी  ऊसाला आग लागून त्याआधी मध्ये ऊस जळून खाक झाला आहे, त्यामुळे पाटील यांचे दोन लाखाचे नुकसान झाले आहे. 

राहुल पाटील हे घरी असताना त्यांच्याच गावातील भगवान दडपे, अशोक शिंदे, पांडुरंग भांगे व इतर लोकांनी त्यांना फोन करून कळवले की तुमच्या शेतातील ऊस पेटलेला आहे तुम्ही कुठे आहात, ऊस पेटल्याची बातमी कळल्यानंतर ते नातेवाईका सह उसाच्या शेताजवळ आले.  बार्शी येथील फायर ब्रिगेड ला फोन करून कळवले परंतु गाडीने न आल्याने मातीने व उसाच्या वाड्याच्या साह्याने आग विझवली त्यामध्ये अंदाजे दोन लाखाचे नुकसान झाले आहे ऊसाला आग कशाने लागली अद्याप कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही या घटनेची खबर राहुल पाटील यांनी तालुका पोलिसात दाखल केली आहे. 


Post a Comment

0 Comments