सोलापूर | परिवहन उपायुक्त राजेंद्र मदनेंच्या मुलीचे अपघाती निधन


सोलापूर |

परिवहन उप आयुक्त राजेंद्र मदने यांची कन्या सई (वय २२, रा. पिंपळी, ता. बारामती, जि. पुणे) हिचे पुण्यात शनिवारी अपघाती निधन झाले. तिच्या पश्‍चात वडील, आई, भाऊ, आजी, आजोबा, चुलते, चुलती असा मोठा परिवार आहे. सन २००७ ते २००९ या काळात मदने हे सोलापुरात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत होते. 

या काळात मनपा परिवहनचाही अतिरिक्त पदभार त्यांनी सांभाळला. या काळात ते कामात व्यस्त असताना परिवहन कामगारांच्या सान्निध्यात त्यांच्या मुलांवर संस्कार झाले. त्यामुळे सोलापूरकरांशी त्यांचा दांडगा संपर्क आहे. सई हिच्या अपघाती निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments