सोलापूर |
नई जिंदगी ते सीतारा चौक या दरम्यान खराब रस्ता आहे.तो रस्ता दुरुस्त करावा किंवा नवीन रस्ता करावा अशी मागणी करत एमआयएमने मौलाना आझाद चौक जवळ रस्त्यावर आंदोलन केले होते. हे आंदोलन केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सोमनाथ वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे. सीतारा चौक ते शांती नगरचौक दरम्यान एमआयएमच्या पदाधिकऱ्यानी व कार्यकर्त्यांनी विनापरवाना आंदोलन केले असल्याची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत अजहर शेख, अनिसा डोका, अब्दुल डोका, इसामोद्दीन पिरजादे, रियाज सय्यद, शाहरुख बागवान व अनोळखी एक याविरोधात भा.द.वि.143,188, 149 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
विना परवाना आंदोलन केले-
एमआयएमच्या अजहर शेख, अनिसा डोका, अब्दुल डोका, इसामोद्दीन पीरजादे, रियाज सय्यद, शाहरुख बागवान हे बुधवारी सकाळी नई परिसरातील सीतारा चौक येथे आंदोलन करत होते. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सोमनाथ वाघमारे हे आंदोलन कर्त्यांना आंदोलनाची परवानगी बाबत विचारले त्यावेळी यांकडे कसलीही परवानगी नव्हती. महानगरपालिका आयुक्तांविरोधात घोषणाबाजी करत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला. अशा अशयाची फिर्याद एमआयडीसी पोलीस पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
0 Comments