सोलापूर |
सोलापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करत आहेत. निर्दयी पतीने आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत तिचे संपूर्ण केस कापत तिचं मुंडन केले. माहेरहून पाच लाख रुपये रोख रक्कम आण असा तगादा लावला. जवळपास महिनाभर एका खोलीत डांबून ठेवले तसेच घरगुती भांडणाचा राग मनात धरून तोंडी तीन वेळा तलाख देत तिला माहेरी आणून सोडले असा आरोप करत संबंधित विवाहित महिलेने जेलरोड पोलीस ठाण्यात पती व सासू सासऱ्या विरोधात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी सर्व खात्री करून ,शहनिशा करून मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती,सासू व सासऱ्या विरोधात भा.द.वि.498(अ), 323, 504, 506,मुस्लिम संरक्षण कायदा 3 व 4 नुसार गुन्हा दाखल केला आहे.सुमैया कलीम चौधरी(वय 20 वर्ष,रा, राजेन्द्र चौक लापूर) असे विवाहित महिलेचे नाव आहे.तर पती कलीम सत्तार चौधरी(वय 25,रा राजेंद्र चौक,सोलापूर),सासू राजिया सत्तार चौध(वय 55 वर्ष,रा,राजेंद्र चौक,सोलापूर),सासरे सत्तार चौधरी (वय 60 वर्ष,रा,राजेंद्र चौक,सोलापूर) अशी आरोपींचे नावे आहेत .
0 Comments