बार्शी |
माजी मंत्री आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या बंगल्यासमोर, गेटच्या आतमध्ये पाच जणांनी आदलीसारखी स्फोटके फोडली आहेत. या प्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. पण यामुळे बार्शीचे राजकारण पेटले आहे.
या प्रकरणी खुद्द माजी मंत्री दिलीप सोपल यांनी फिर्याद दाखल केली आहे. ही घटना २३ ऑक्टोबरला घडली होती. त्या सोपल यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता. पण, आज त्यांनी स्वतः पोलिस ठाण्यात जात आरोपींची नावे जाहीर केली आहेत. पेशा रणझुंजारे, नागेश मोहिते, नीलेश मस्के, अंबादास रणझुंजारे, महेश पवार यांच्यावर सोपल यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ ऑक्टोबरच्या रात्री पाच जणांनी मध्यरात्री सोपल यांच्या बंगल्यासमोर स्फोटके फोडली यात एका
स्फोटामुळे गवत जळाले, तर एक स्फोटक झाडाला धडकून खाली पडले, आणखी एका स्फोटकामुळे सुरक्षा रक्षकाच्या बंगल्याचे नुकसान झाले आहे. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.
पोलिसांनी पंचनामा केला असून संगनमत करुन शांतता भंग केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बार्शीचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण शिरसट तपास करीत आहेत. पण या घटनेमुळे बार्शीचे राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
0 Comments