भारतीय संघाचे टी-20 विश्वकरंडकातील आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले आणि 2013 नंतर आयसीसी करंडक जिंकण्याच्या आशांवर पाणी फेरले गेले. या अपयशानंतर बीसीसीआयने शुक्रवारी निवड समिती सदस्यांना डच्चू दिला आहे. तसेच नव्या नियुक्तीसाठी अर्जही मागवले आहेत. भारतीय वरिष्ठ पुरुषांच्या संघाच्या निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा होते. त्यांच्यासह संपूर्ण समिती सदस्यांना बीसीसीआयकडून काढून टाकण्यात आले आहे . अशा परिस्थितीत रोहित शर्माचे कर्णधारपदही धोक्यात आले आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारत टी-20 विश्वचषक - 2022 मध्ये खेळला आणि उपांत्य फेरीत पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडला होता.
बीसीसीआयने शुक्रवारी मोठा निर्णय घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे, बोर्डाने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय वरिष्ठ निवड समितीची हकालपट्टी केली. चेतन शर्मा, हरविंदर सिंग, सुनील जोशी आणि देबाशिष मोहंती यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. चेतन निवड समितीचे प्रमुख असल्याने, भारत दोन आयसीसी स्पर्धांमध्ये विजेतेपदाविना परतला. टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत झाला तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभूत झाला.
0 Comments