"आमदार राजेंद्र राऊत यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करा"



बार्शी |

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये समाविष्ट करुन मंत्रिपद द्यावे, या मागणीचे निवेदन तडवळे (ता. बार्शी येथील माजी सैनिक संजय आवारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सचिवांना दिले आहे. आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शीमध्ये विकास कामाचा झपाटा लावला आहे. काल बार्शी मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध विकासकामाचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा पार पडला, अशा विकासामुळे लोकनेत्याला मंत्रिपद मिळालेच पाहिजे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.


आमदार राऊत हे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार असून तालुक्याच्या विकासाची कामे करण्यासाठी त्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यावे. आमदार राऊत यांनी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर व माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी पक्षासाठी केलेल्या कामाचा आवाका लक्षात घेऊन त्यांना मंत्रिपद देऊन त्यांच्या कार्यास गती द्यावी, अशा प्रकारचे निवेदन आवारे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दिले आहे.

Post a Comment

0 Comments