बीडमध्ये नवविवाहित तरुणाचा संशयास्पद मृत्यू , तीन आठवड्यापूर्वी झाला होता विवाह


बीड |

 जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील तीन आठवड्यांपूर्वी विवाह झालेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सदरील घटना ही सोमवार ( ९ नोव्हेंबर ) रोजी रात्री घडली असून यामध्ये घातपात झाला असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

याप्रकरणी नातेवाईकांनी गेवराई पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन देखील केली आहे, या प्रकरणाची पोलिसांनी योग्य ती तपासणी करून न्याय द्यावा अशी मागणी देखील नातेवाईकांनी केली आहे, मयत तरुणाचा मृतदेह शेव विच्छेदनसाठी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, या घटनेचा अधिक तपास गेवराई पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments